ताजी बातमी ऑनलाइन टीम
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्येही जम बसवू लागल्या आहेत. अनेक अभिनेत्यांनीही त्यांचे नशिब हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजमावले.दरम्यान काही अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यास नकार दिला आहे. प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू याने देखील बॉलिवूमध्ये चित्रपट करण्यावर भाष्य केले आहे.
अभिनेता महेश बाबू याला एका कार्यक्रमात बॉलिवूडमधील एंट्री कधी करणार, केव्हा हिंदी सिनेमात तुला बघता येईल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो असं म्हणाला की- ‘मला हिंदी चित्रपट करण्याची आवश्यकताही नाही आहे.
तेलुगू सिनेमा केल्यानंतरही तो जगभरात सगळीकडे बघितला जात आहे. आता देखील हेच घडत आहे.’ महेश बाबूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टारचे फॅन असणाऱ्या अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाचा डंका पाहायला मिळाला. दरम्यान त्याच राजामौली यांच्यासह अभिनेता महेश बाबू याने नवी सिनेमा साइन केला आहे. महेश बाबू या सिनेमासाठी देखील उत्साहित आहे. बाहुबली सीरिज, RRR नंतर राजामौली यांचा हा सिनेमा देखील संपूर्ण देशभरात हिट ठरेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महेश बाबू त्याच्या मुलीमुळे चर्चेत आला होता. तेलुगू सुपरस्टार महेशबाबूच्या ‘सरकारू वारी पाता.. या सिनेमातील ‘पेनी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यामध्ये महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने देखील पदार्पण केले आहे. या गाण्यात बापलेकीच्या जबरदस्त डान्स मुव्ह्ज पाहायला मिळत आहेत.




