Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड Hafiz Saeed ला 31 वर्षांची कैद,...

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड Hafiz Saeed ला 31 वर्षांची कैद, कोर्टाचा मोठा निर्णय

पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने (Pakistan anti terror court) शुक्रवारी (8 एप्रिल 2022 ) मोठी निकाल दिला. तो म्हणजे मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा (Mumbai Terrorist Attack) मास्टर माईंड आणि जमात-उद-दावा (Jamaat-ud-Dawa) आणि लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) म्होरक्या हाफिझ सईद (Hafiz Saeed) याला 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इतकंच नाही तर कोर्टाने सईदला 3.40 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. त्याचबरोबर त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
 
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मास्टर माईंड हाफिझ सईदच्याच इशाऱ्यावरून लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला (26/11 Mumbai Attack) केला होता. या हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला संयुक्त राष्ट्रांनी हाफिझला जबाबदार ठरवण्यात आले होते. त्याला जागतिक दहशतवादी देखील जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेने हाफिझ सईदवर 1 कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

एकूण 68 वर्षांची शिक्षा..
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी दहशतवाद विरोधी कोर्टाने हाफिझ सईदला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग terror funding case) केल्या प्रकरणात ही शिक्षा आहे. यााधी देखील त्याला 36 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. हाफिझ सईदला एकूण 68 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा एकत्रित भोगावी लागणार आहे.
हाफिज सईदला यापूर्वीच दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या पाच प्रकरणांत (टेरर फंडिंग – terror funding case) 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिज सध्या टेरर फंडिंग प्रकरणात कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -