ताजी बातमी ऑनलाईन टीम
साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने उचलली. तो प्रदार्पणातच महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिल लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला मात दिली.
शुक्रवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर शनिवारी सकाळी सेमी फायनल चे सामने झाले. यामध्ये माती गटात विशाल बनकर याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली. तर पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे आणि हर्षल कोकाटे यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.
पृथ्वीराज पाटीलने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.