ताजी बातमी ऑनलाइन टीम
आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राईडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स अशी लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. कोलकाताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अंकतालिकेत कोलकाता नाईट राईडर्स पहिल्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे.
दिल्लीने यंदा तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाता नाईट राईडर्सने ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजय मिळवला आहे. एका सामन्यात कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीने दमदार सुरूवात केली आहे. दिल्लीने चौथ्या षटकाअखेर ४३ धावांपर्यंत मजला मारली आहे. पृथ्वी शॉ ने १५ चेंडूमध्ये २४ धावा केल्या आहेत तर डेव्हिड वॉर्नरने ८ चेंडूमध्ये १५ धावा फटकावल्या आहेत.