ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सलमान खानची ‘वॉन्टेड गर्ल’ आयशा टाकियाचा (Ayesha Taikia) आज वाढदिवस आहे. 10 एप्रिल 1986 रोजी मुंबईत जन्मलेली आयशा टाकियाने (Happy Birthday Ayesha Takia) बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केले. पण आयशा टाकियाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे ‘टारझन द वंडर कार’ आणि सलमान खानच्या (Salman Khan) ‘वॉन्टेड’ चित्रपटामुळे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये पदार्पण करणारी आणि 15 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणारी आयशा टाकिया सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आयशा टाकिया आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. आयशा टाकियाने तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. ती सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सुद्धा आजही चर्चेत असते. आयशा टाकियाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
आयशा टाकियाचा जन्म 10 एप्रिल 1986 रोजी मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला आहे. आयशाचे वडील गुजराती आणि आई महाराष्ट्रीयन होती. मुंबईतच सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. वयाच्या `13व्या वर्षापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. आयशाने वयाच्या 15व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पण तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून कॅमेरा फेस करण्यास सुरुवात केली होती. आयशा टाकिया पहिल्यांदा ‘कॉम्प्लॅन’च्या जाहिरातीत दिसली होती. त्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चुनर उड उदड जाये’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली.
आयशाने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर ‘टारझन: द वंडर कार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर आयशाने शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) ‘दिल मांगे मोर’, अभय देओलसोबत (Abhay Deol) ‘सोचा ना था’ सारख्या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटात प्रेक्षकांनी आयशा टाकियाला भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटामुळे तिला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. 2013 मध्ये आलेल्या ‘आप के लिए हम’ या चित्रपटात शेवटची दिसलेली आयशा टाकिया आता मोठ्या पडद्यापासून पूर्णपणे दूर आहे. ती तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते.
आयशा टाकिया एकेकाळी ब्रेस्ट इम्प्लांट, ओठ आणि चेहऱ्याची शस्त्रक्रिया करून चर्चेत आली होती. मात्र, शस्त्रक्रियेचे वृत्त तिने फेटाळून लावले होते. आयशाच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले जेव्हा 23व्या वर्षी तिने लग्न केले. आयशाने 2009 मध्ये समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले. तेव्हापासून आयशा चित्रपटांपासून दूर आले. तिने सध्या चित्रपटात काम करणे सोडले आहे. 2013 मध्ये आयशाने पहिला मुलगा मिकाइलला जन्म दिला. आयशा सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.