ताजी बातमी ऑनलाइन टीम
जपानी वाहन निर्माती कंपनी निसान (Nissan) अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा (NASA) सोबत भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Future Electric Vehicles)नवीन प्रकारची बॅटरी विकसित करण्यासाठी काम (Nissan working with NASA) करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएस स्पेस प्रोग्राम आणि निसान यांच्या सहकार्याने सॉलिड-स्टेट बॅटरी (Solid state batteries) विकसित केल्या जातील. रिपोर्टनुसार आगामी काळात या बॅटरी सध्या वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरींची (lithium-ion batteries) जागा घेतील. सॉलिड स्टेट बॅटरी अतिशय हलकी, सुरक्षित आणि चार्ज होण्यासाठी अतिशय जलद मानली जाते.
रिपोर्टनुसार, निसान-नासा भागीदारीद्वारे (US Space Program) विकसित करण्यात केली जात असलेले सॉलिड-स्टेट बॅटरीसह पहिले उत्पादन 2028 मध्ये लॉन्च केले (Nissan-NASA Solid State Batteries Project) जाईल. मात्र एक पायलट आधी प्लांट लॉन्च केला जाईल जो 2024 च्या सुरुवातीला होऊ शकतो. एकदा उत्पादनात आल्यानंतर सॉलिड-स्टेट बॅटरी पूर्णपणे लिथियम-आयन बॅटरीची जागा घेऊ शकते. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, निसान आणि NASA ने विकसित केलेली सॉलिड-स्टेट बॅटरी तयार झाल्यानंतर EV मध्ये वापरल्या जाणार्या सध्याच्या बॅटरीच्या तुलनेत आकाराने अर्धी असेल. त्याचबरोबर बॅटरी चार्जिंगसाठी लागलणाऱ्या वेळेत लक्षणीय घट होईल.