ताजी बातमी ऑनलाईन टीम
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक लवकरच एसबीआय लिपिक भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे.
बँकेची आपल्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ही अधिसूचना उमेदवार पाहू शकणार आहेत. बँकेच्या नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार अनेक दिवसांपासून एसबीआयच्या भरतीची वाट पाहत होते. मात्र आता त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. एसबीआय लवकरच भरतीची अधिसूचना जारी करणार आहे. यानंतर उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. SBI लिपिक पदांच्या भरती संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर SBI दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान भरती अधिसूचना जारी करते हे लक्षात येते. यावर्षी देखील बँक एप्रिलमध्ये अधिसूचना जारी करू शकते. SBI लिपिक परीक्षा जून-जुलैमध्ये आयोजित करणे अपेक्षित आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लिपिक पदांसाठी परीक्षा संगणकावर आधारित असेल. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा (SBI Clerk preliminary exam) उत्तीर्ण करतील त्यांना मुख्य परीक्षा आणि त्यानंतर भाषा चाचणीमध्ये बसण्याची संधी मिळेल.