ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोलापूर : एकीकडे राज्यात सर्वत्र श्री रामजन्मोत्सवाचा उत्साह होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं राज्यात आयोजन करण्यात आलं. मात्र सोलापुरात श्री रामजन्मोत्सवाच्या उत्सावाला गालबोट लागलंय. सोलापुरात श्री रामजन्मोत्सव यात्रेदरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यात वादावादी झाली.
कतम चौकात पोलिस आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यात वादावादी झाल्यानं परिसरात तणाव पाहायला मिळाला. पोलिसांनी मिरवणूक मार्गात अचानक बदल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक यावेळी झाली. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी यात्रेच्या मार्गात बदल केल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, हजारो युवक कोंतम चौकात जमा झाल्याने वातावरण तापलं होतं.