ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्या होणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त केला आहे. मतदारसंघातील सात संवेदनशील ठिकाणावर पोलिस करडी नजर ठेवन आहेत.
राज्य राखीव व केंद्रीय सुरक्षा बलाच्या
तकड्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या मदतीने नाकाबंदी व गस्तीची जोड देण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्र आणि त्याबाहेरील बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.
पोटनिवडणुकीसाठी ३५७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान अमिषे प्रभोलने दाखविण्याचा प्रयत्न
करणाऱ्याप्रवृत्तीसह आणि दहशत गुंडगिरी करणाऱ्या समाजकंटकावर विशेष पथकांकडून वॉच ठेवला जात आहे.
पोलिस अधीक्षक शैलश बलकवडे यांनी आज शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतदार संघातील मतदारांनी आपले मतदान निर्भयपणे करावे असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
कनाननगर, सिद्धार्थनगर, मुक्तसैनिक, वारेवसाहत, टिंबर मार्केट, शिवाजी पेठ, गंजीमाळ आदी संवेदनशील ठिकाणी आज पासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये तावडे हॉटेल चौक, फुलेवाडी, पंचगंगा नदी पूल, आपटेनगर, आर.के.नगर, शाहू टोल नाका, टेंबलाईवाडी नाका आदींचा समावेश आहे.
६७ जण हद्दपार निवडणूक काळात ३५१ जणांना अजामीनपात्र वॉरंटची बजावणी केली. निवडणुकी काळात संघटित गुन्हेगारी टोळीसह रेकॉर्डवरील ६७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच उ हाणामारीसह अवैध धंद्यातील रेकॉर्डवरील ३४७ जणांवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स सांगितले.