ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे; मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षा व मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसून आता कंपन्या स्वत:च परीक्षा(exam) घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे.
गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. अभियांत्रिकीसह सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक)करता आले नाही. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा(Online exam) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे (एमसीक्यू) झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे नोकरी कोणाला द्यावी, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला.