देशामध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) आणि सीएनजीच्या दरवाढीने (CNG Price Hike) नवा उच्चांक गाठला आहे. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशामध्ये आता नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलची सततची दरवाढ लक्षात घेता इलेक्ट्रिक गाड्या (Electric Vehicles) खरेदी करण्याला जास्त पसंती दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याचे प्रमाण खूप वाढले (Electric Vehicles Sale Increase) आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील जनता जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करताना दिसत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 2021-22मध्ये देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीने चार लाख युनिटचा टप्पा ओलांडला. इलेक्ट्रिक वाहन विक्रीमध्ये टू व्हिलर क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (FADA) नुकताच याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात 2020-21च्या तुलनेमध्ये आर्थिक वर्षे 2021-22 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एकूण किरकोळ विक्री तिपटीने वाढली असून 4,29,217 युनिटवर पोहचली आहे. तर मागच्या वर्षी ही किरकोळ विक्री 1,34,821 युनिट्स इतकी होती. तर 2019-20मध्ये देशात 1,68,300 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.
मागच्या आर्थिक वर्षामध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 2020-21 च्या 4,984 युनिट्सच्या तुलनेमध्ये 17,802 युनिट्सवर पोहोचली आहे. ही वाढ तीनपट आहे यामध्ये देशातील वाहन कंपनी टाटा मोटर्स आघाडीवर आहे. टाटा मोटर्स 15,198 युनिट्सच्या किरकोळ विक्रीसह आघाडीवर आहे. या कंपनीचा बाजार हिस्सा 85.37 टक्के इतका राहिला आहे. टाटा मोटर्सनंतर एमजी मोटर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमजी मोटर इंडियाचे 2,045 युनिट्स विक्री झाले आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा 11.49 इतका आहे. तर महिंद्रा अँड महिंद्रा 156 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आणि ह्युंदाई मोटर 128 युनिटच्या विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. दोघांचा देखील बाजारातील हिंसा एक टक्का इतका आहे.
Diesel दरवाढीमुळे Electric Vehicles खरेदीकडे कल वाढला, विक्रीमध्ये 218 टक्क्यांनी झाली वाढ!
Petrol-Petrol-Diesel दरवाढीमुळे Electric Vehicles खरेदीकडे कल वाढला, विक्रीमध्ये 218 टक्क्यांनी झाली वाढ!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -