‘बाहुबली’नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’ च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले आहेत. राजामौलींच्या सिनेमाची सूत्रं प्रत्येक सिनेमात इतकी फिट बसवली जातात की, सिनेमा हमखास यशस्वी ठरतो. या सूत्रांनाच एकत्रितपणे ‘राजामौली फॅक्टर’ असं म्हणता येईल.
2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगिनिंग’ नावाचं वादळ देशभरातल्या थिएटरमध्ये घोंघावत होतं. त्यानंतर पुढचे काही महिने प्रभास, रम्या कृष्णन, राणा दगुबाती, सत्यराज, तमन्ना ही त्यातल्या कलाकारांची नावं तर याच्या-त्याच्या तोंडी होतीच! त्याचबरोबर या सगळ्यांना एकत्र आणणारं नाव मात्र आदराने घेतलं जात होतं. ते नाव म्हणजे कोदुरी श्रीशैल श्री राजामौली म्हणजेच दिग्दर्शक एस. एस. राजामौली!
राजामौलींनी त्यांच्या दोन दशकांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत एकूण बारा सिनेमे बनवले. या बाराही सिनेमांनी छप्परतोड कमाई करत राजामौलींना भारतीय बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर नेऊन बसवलं. जागतिक स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावणार्याऑ ‘बाहुबली’नंतर राजामौली ‘आरआरआर’ घेऊन आलेत.
पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 710 कोटींचा गल्ला जमा केला. यात भारताचा वाटा 560 कोटींचा असून, त्यातली 280 कोटींची कमाई तर निव्वळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्येच झाली आहे. ज्युनिअर नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा आणि राजामौली या त्रिकुटाचा हा करिश्मा बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम बनवत आहे.
राजामौलींचे सिनेमे ‘बाहुबली’ येण्याआधीपासूनच प्रसिद्ध होते, पण ते त्यातल्या कलाकारांमुळे. प्रभासचा ‘छत्रपती – हुकुमत की जंग’, रामचरण तेजाचा ‘मगधीरा’, ज्यु. एनटीआरचा ‘सिम्हाद्री – यमराज एक फौलाद’, रवी तेजाचा ‘विक्रमार्कुडू – आयपीएस विक्रम राठोड’ ही त्यातली काही खास नावं. तसं म्हणायला 2012 ला आलेल्या नानीच्या ‘इगा – मख्खी’ने त्यांचं नाव चर्चेत आलं होतं खरं, पण ते फार काळ चर्चेत टिकलं नाही. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ने त्यांना खरी ब्रँड व व्हॅल्यू मिळवून दिली.
2017 च्या ‘बाहुबली 2’नंतर राजामौलींचा पुढचा सिनेमा कुठला असणार, याचा अंदाज लावत असतानाच राजामौलींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘मेगा पॉवर स्टार’ रामचरण तेजा आणि ‘यंग टायगर’ ज्यु. एनटीआरसोबत एक फोटो टाकला आणि चर्चांना उधाण आलं. मार्च 2018 मध्ये हे दोघेही कलाकार राजामौलींच्या नव्या सिनेमात एकत्र काम करणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर झालं.
‘आरआरआर’ यशाचा ‘राजामौली’ फॅक्टर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -