रामनवमीचा सण देशभरात उत्साहात साजरा झाला, पण काही ठिकाणी या सणाला हिंसाचाराचे गालबोट लागले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मांस खाण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. अनेक विद्यार्थी जखमी झाले.
डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना रविवार असल्याने मटण खायचे होते. ते रामनवमीची पूजा मांडणार्यांरनी खाऊ दिले नाही, असा आरोप डाव्यांनी केला, तर रामनवमीच्या पूजेला डाव्यांनी विरोध केल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. झारखंडमधील लोहरदगा-बोकारोत राम मिरवणुकीवर दंगलखोरांनी दगडफेक केली. वाहने जाळली. रांचीहून दिल्लीला निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसवरही दगडफेक झाली.
गुजरातेतील हिंमतनगर आणि आणंद शहरात राम नवमी मिरवणुकीवर दगडफेक झाली. अनेक दुकानेही जाळण्यात आली. दगडफेकीत साबरकांठाचे पोलिस अधीक्षकही जखमी झाले.
रामनवमीला ठिकठिकाणी दगडफेक, दंगलीचे गालबोट
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -