कोरोना आपले रूप बदलत आहे आणि तो पुन्हा पुन्हा येत आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) दिला. गुजरातमधील ‘मॉं उमिया धाम’ च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
कोरोना कुठेही गेलेला नाही, तो रूप बदलून पुन्हा पुन्हा येत आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, कोरोना करीत असलेली हानी लक्षात घेता लोकांनी बेफिकीरी दाखवू नये आणि सर्व प्रकारच्या दक्षता घेतल्या पाहिजेत. काेराेना बहुरुपी रूप बदलून कधी येईल, याची काहीच शाश्वती नाही.
कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून व्यापक प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत 185 कोटी डोसेस देण्यात आलेले आहेत. धरती मातेला वाचविण्यासाठी मॉं उमिया धामच्या भक्तांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.
कोरोना आपले रूप बदलत आहे आणि पुन्हा पुन्हा येत आहे : पंतप्रधान मोदी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -