Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगभीषण अपघात; दुचाकीवरील दोघे जागीच ठार

भीषण अपघात; दुचाकीवरील दोघे जागीच ठार


मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे (ता.कणकवली) येथिल ओव्हर ब्रीजनजीक खासगी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. गोव्यावरुन भरधाव येणारी खाजगी आराम बसने दुचाकीली मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. निवृत्ती उर्फ अकुंश सोनू घाडी (वय-50, रा.पेंढरी) व राजश्री रमेश घाडी (वय-45,रा. चांदोशी, सडेवाडी तळेबाजार) अशी मृतांची नावे आहेत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही दुर्घटना रविवारी रात्री ९.४५वाजता घडली.

या अपघाताची भीषणता इतकी होती की, धडकेनतंर दुचाकी बसच्या पुढील भागात अडकून पडली होती. तर मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महामार्गावर रक्तांचा सडा वाहत होता.

गोव्यावरुन खाजगी आराम बस मुंबईच्या दिशेन , तर तळेरेच्या दिशेन दुचाकीस्वार तळेरेच्या दिशेने होते. यादरम्यान खासगी आराम बसने मागून धडक दिली. दुचाकीवरील दाेघे जागीच ठार झाले. या अपघातात  आराम बसचेही मोठे नुकसान धाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -