Wednesday, September 17, 2025
Homeब्रेकिंगसुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे...

सुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबले

पीडित महिलेची मोठी बहिण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि तिची सुटका केली.

दिसायला सुंदर असलेल्या पत्नीवर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पती ने पत्नीसह मुलांना तब्बल दहा वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मनोज कुलकर्णी असे पत्नीला डांबून ठेवणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या बहिणीने महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली. तब्बल दहा वर्षे घरात कोंडून राहिल्यामुळे महिलेला धड चालायलाही जमत नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महिलेला बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पीडित महिलेच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांच्या मदतीने केली सुटका पीडित महिला पती मनोज कुलकर्णीसमवेत जालना रोड परिसरात वास्तव्यास आहे. पीडित महिलेची मोठी बहिण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली. महिलेला उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या महिलेवर उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -