Saturday, March 15, 2025
Homeमनोरंजनअनन्याचा स्विमसूट पाहून नेटकरी उतावीळ, म्हणाले- 'सर्वांना वेड लावलंस'

अनन्याचा स्विमसूट पाहून नेटकरी उतावीळ, म्हणाले- ‘सर्वांना वेड लावलंस’

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे जेव्हा केव्हा तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा तो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आता तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या फेमस होण्यासाठी एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अनन्याने तिचे पुलमधील फोटो पोस्ट केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने व्हाईट कलरचा स्वीमसूट परिधान केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी तिला भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.

अनन्याने तिचे दोन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती पूलमध्ये दिसते. तिने व्हाईट कलरचा स्विमसूट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. केसांवरून हात फिरवताना तिने कॅमेरासमोर मस्त पोज दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

याशिवाय तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. या ड्रेसमध्ये अनन्या पांडे हॉट दिसत आहे. ती बेडवर बसून पिझ्झाचा आस्वाद घेत असल्याचे चित्रात दिसत आहे. पिझ्झाची अनेक बॉक्स तिच्या बाजूला दिसताहेत. अनन्याचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताहेत.

वर्क फ्रंटवर, अनन्या पांडे शेवटची ‘गहराईयां’ मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवासोबत काम केले होते. तिने नुकतेच सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा ‘लायगर’ हा चित्रपट आहे, ज्यामध्ये ती विजय देवराकोंडासोबत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -