Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रगांजा आणून विक्री करणाऱ्या तिघांना अटक

गांजा आणून विक्री करणाऱ्या तिघांना अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

धुळे येथील शिरपूर परिसरातून गांजा विक्री प्रकरणी डोंबिवली पूर्व येथील दोन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. शिरपूर येथून गांजा विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीला देखील पोलिसांनी शिरपूर येथेच अटक केली . त्यांच्याकडून ५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली गाडी असा १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


देसले पाडा येथे राहणारा मयूर जडाकर (वय २५) आणि डोंबिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्थित असणारा अखिलेश धुळप (वय २६) असे डोंबिवलीतील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शिरपूर येथून सुनील उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा याला अटक केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात गांजाचा साठा करून ठेवला आहे. तसेच शिरपूर परिसरातील लोक जंगली भागात गांजाचे उत्पादन घेत आहेत. या गांजाची शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागले, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, पोलीस कर्मचारी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -