Thursday, March 13, 2025
HomeमनोरंजनAvni : ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेची Avni माहिती आहे...

Avni : ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेची Avni माहिती आहे का ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

छोट्या पडद्यावरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील बालकलाकार स्वराविषयी माहितीये का? (Avni ) मालिकेच्या प्रोमोमध्ये चिमुकल्या स्वरा झळकली होती. प्रोमोमध्ये तिने आपल्याकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका साकारते आहे बालकलाकार अवनी तायवाडे. (Avni) अवनी मुळची नागपूरची आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी.



अवनीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवनीला मराठी मालिकेत काम करण्याची खूप इच्छा होती.



‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी अवनीने ऑडिशन दिली आणि तिची निवडही झाली. सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आलीय. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते. ( Avni Taywade )

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -