Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकमहिलांनी वर्षभरासाठी गर्भधारणा टाळावी; सरकारचं महिलांना आवाहन

महिलांनी वर्षभरासाठी गर्भधारणा टाळावी; सरकारचं महिलांना आवाहन


कोरोनाचा धोका संपूर्ण जगाला आहे. अशातच कोरोनाचं नवं रूप डेल्टा समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकारामुळे झालेल्या थैमानामुळे नवविवाहित महिलांना गर्भधारणा काही काळ पुढे ढकलण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेत सुमारे 40 गर्भवती महिलांच्या मृत्यूनंतर आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला दिला आहे.


डेल्टा व्हेरिएंटचा धोका
सरकारच्या सल्ल्यावर वादविवादही झाला, त्यानंतर देशातील प्राथमिक आरोग्य सेवा, महामारी आणि कोविड रोग नियंत्रण मंत्री डॉ.सुदर्शनी फर्नांडोपुले यांनी सांगितलं की, देशातील कोरोना प्रतिबंधासाठी गठित तज्ज्ञ समितीच्या सल्ल्याने ही बाब पब्लिक डोमेन झाली.


या सल्ल्यामध्ये, महिलांना आई आणि मुलाच्या सुरक्षेसाठी एक वर्षासाठी गर्भधारणा टाळण्याबाबत सांगण्यात आलं होतं. आरोग्य मंत्री म्हणाले की, कोरोनाचे नवीन रूप सुरुवातीच्या विषाणूपेक्षा अधिक प्राणघातक आहे आणि तो वेगाने पसरतोय.


हेल्थ प्रोग्राम ब्युरोचं स्टेटमेंट
त्याचवेळी, सरकारच्या आरोग्य कार्यक्रम ब्युरोच्या संचालिका चित्रामाली डी सिल्वा म्हणाल्या, “देशात साधारण परिस्थितीमध्ये दरवर्षी सुमारे 100 गर्भवती महिलांचा मृत्यू होतो. त्याच वेळी, कोविड -19च्या तिसऱ्या लाटेच्या प्रारंभापासून सुमारे 41 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे.


आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, “आम्ही नवविवाहित जोडप्यांना आणि इतरांना सल्ला देत आहोत की कोरोनाचा धोका लक्षात घेता कमीत कमी एक वर्षासाठी कुटुंब नियोजन पद्धती वापरा.”
चित्रामली डि सिल्वा पुढे म्हणाल्या, “देशात आतापर्यंत 5500 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 70% लसीकरण पूर्ण झालं आहे. तज्ज्ञांनी गर्भवती महिलांना लस घेण्याचा सल्ला दिला आहे. ऑगस्टपासून लॉकडाऊन नियमांमध्ये बरीच शिथिलता देण्यात आली आहे. जी सरकार लवकरच संपुष्टात आणू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कठोर निर्बंधांची शिफारस केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -