राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरु आहे. खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान अधिक असून याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सरासरी तापमान 40 अंशाच्या पुढेच आहे. अशातच राज्यात आतापर्यंत 92 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या रुग्णामध्ये जळगाव जिल्ह्यातली 3, नागपूर- 2 तर अकोला, अमरावती आणि उस्मानाबाद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तर नागपूर विभागात 62, अकोला विभागात 15, नाशिक विभागात 9 तर लातूरमध्ये एका व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे.
महाराष्ट्रातील काही भागात तापमान 40 अंश पार
महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश, मराठवाडासह काही भागाचे तापमान एप्रिलच्या सुरुवातीपासूनच 40 अंशाच्या पार गेले आहे. पुणे विभागात आतापर्यंत 5 जण उष्माघाताने आजारी पाडले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच ही परिस्थिती आहे. तर मे महिन्यात काय स्थिती राहिला याची भीतीने नागरिकांमध्ये दिसून येत आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता भारतीय हवामान विभागाच्या (MID) प्रादेशिक हवामान केंद्र, मुबई यांच्याकडून आधीच गंभीर इशारा देण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा पातळीवर यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहे. या जिल्हानिहाय समितीकडून उष्माघात झालेल्या रुग्णाची नोंद, त्याच्यावर उपचार, मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद व विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिमाणी मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढली आहे, असे राज्याचे साथसर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी
– उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
– हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
– बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, सनकोट, बुट व चपलांचा वापर करावा.
– प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
– आवश्यकता असल्यावरच उन्हात बाहेर जावे.
– शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित सेवन करा.
– उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेत उपचार घ्यावा.
हे प्राथमिक उपचार करा
उष्माघात झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना सर्वात आधी रुग्णास हवेशीर खोलीत ठेवा. या खोलीत पंखे, कुलर किंवा वातानुकुलित यंत्रणा असल्याचा उत्तम. दरम्यान, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. यासह रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, उष्माघात झालेल्या व्यक्तीस ORS किंवा लिंबू सरबत देत तात्काळ रुग्णालयात न्यावे याठिकाणी उपाचारादरम्यान अवश्यकतेनुसार शीरे वाटे सलाईन द्यावी.
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात उष्माघाताने घेतला 8 जणांचा बळी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -