चैत्रीशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.
चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात ७०० किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने एकादशी निमित्त पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांसाठी खिचडी आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
नित्यपूजेस मंदीर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य माधवी निगडे, शकुंतला नडगिरे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.