Thursday, July 31, 2025
Homeमनोरंजनअभिनय क्षेत्रात पदार्पण करणार देवगण कन्या?

अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार देवगण कन्या?


बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या आगामी रन-वे-34 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यातच अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये करिअर करत असतानाच अजय देवगणची कन्या न्यासा ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. अजयने आता न्यासाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

अजयला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, बॉलिवूडमध्ये न्यासा पदार्पण करणार आहे का? अजयने या प्रश्नाला उत्तर दिले की, सध्या तिला अभिनय क्षेत्रात काम करायची इच्छा नाही. या क्षेत्रात न्यासा करिअर करेल की नाही, हे मला माहित नाही.

अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही सध्या 18 वर्षाची आहे. शिक्षणासाठी ती सिंगापूर येथे गेली होती. ती आता स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने काही दिवसांपूर्वी न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -