CBI ने अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लष्कराच्या भरती परीक्षेतील पेपर लीक प्रकरणी लेफ्टिनेंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. भरती परीक्षेच्या Answer Sheet लीक प्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लष्करातील लेफ्टिनेंट कर्नलसह त्याच्या दोन सहकारी, हवालदार आणि शिपाईविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयचे अधिकारी भारतीय लष्करात लाचखोरी प्रकरणी चौकशी करत असताना भरती परीक्षेच्या उत्तर पत्रिका लीक झाल्याप्रकरणाच पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये पुण्यातील लष्कराचे दोन हवालदार आणि लेफ्टिनेंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आर्डिनेन्स कोअर, पुणे द्वारा 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सी’ पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
सीबीआयच्या चौकशी धक्कादायक माहिती समोर आली होती. एक हवालदार आणि लेफ्टिनेंट कर्नल रॅंकचा अधिकारी 2020-21 मध्ये आयोजित एक लष्कर भरती परीक्षा आणि निवड प्रक्रियेत सहभागी होता. लेफ्टिनेंट कर्नलने प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्नांची उत्तरे आरोपी हवालदाराच्या पत्नीच्या नावे नोंद असलेल्या एका मोबाईल फोनवर पाठलले होते. उत्तर पत्रिका संच इतर मोबाईल फोनवर पाठवण्यात आले होते.
सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टिनेंट कर्नल आणि एका शिपाईला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिली कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी दोन संशयीत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे संबंधित दस्ताऐवज आढळून आले होते.