Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानCNG दरवाढीचा पुन्हा फटका; दरात इतक्या रुपयांची झाली वाढ

CNG दरवाढीचा पुन्हा फटका; दरात इतक्या रुपयांची झाली वाढ

महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बुडाले असताना दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता पुण्यात सीएनजीचे दर देखील वाढले आहे. पुण्यात सध्या पेट्रोलचा भाव 120 रुपयांवर तर डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. अशात सीएनजी दरवाढीचा फटका पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.

पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवादीनुसार सीएनजीच्या (CNG) दरात प्रतिकिलो 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनुसार पुण्यात आता सीएनजी 68 रुपयांवरून 73 रुपयांवर पोहोचले आहे. आज सकाळी 6 वाजेपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहे. पुण्यात याआधी म्हणजे 6 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानुसार सीएनजी 62 रुपयांवरून 68 रुपये प्रती किलोवर पोहचले होते.

आजच्या नवीन दरवाढीमुळे सीएनजी आता 73 रुपयांवर पोहोचले आहे. सीएनजी गॅसच्या मिश्रनात एका विशिष्ट गॅस देखील मिसळला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गॅसची किंमत वाढल्याने सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. आजच्या दरवाढीसह गेल्या आठवडाभरात राज्यात सीएनजीच्या किमतीत 12 रुपये प्रति किलो तर पीएनजीचे दारा 9.5 रुपये प्रति घनमीटरपर्यंत वाढले आहे.

तर पेट्रोल डिझेलच्या बाबतीत विचार केला तर आज दिलासा मिळाला आहे. मंगळवारी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल केलेला नाही. गेल्या आठवडाभरापूर्वीच पेट्रोलच्या दारात वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. गेल्या बुधवारी पेट्रोलच्या दरात 80 पैशांची वाढ झाली होती. दरम्यान, 12 मार्च ते आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -