Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगअभिनंदन मोदीजी!! महागड्या गॅस सिलेंडरची भेट दिल्याबद्दल त्रिवार अभिनंदन!!

अभिनंदन मोदीजी!! महागड्या गॅस सिलेंडरची भेट दिल्याबद्दल त्रिवार अभिनंदन!!

आज गॅसपासून ते पेट्रोल, डिझेलमध्ये कमालीची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांशी गरीब जनताही हैराण झाली आहे. याच दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत खोचक असा टोला लगावला आहे.

दिवसेंदिवस सतत वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात सध्या जनतेच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष वाढत आहे. अशात काँग्रेसकडूनही सध्या वातावरण तापवण्याचे काम केले जात आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पटोले यांनी ट्विटमधून वाढत्या गॅसदरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत त्यांना टोला लगावला आहे. राणी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “अभिनंदन मोदीजी!! महागाईचा बीमोड करण्याच्या वल्गना करुन
सत्तेत आल्यावर गरीब भारतीय जनतेला जगातील सर्वात महागड्या गॅस सिलेंडरची भेट दिल्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन!!’ असे ट्विट करतात पटोले यांनी मोदींना टोला लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -