Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनसोनम कपूरच्या घरात दरोडा टाकणाऱ्या कपलला अटक

सोनम कपूरच्या घरात दरोडा टाकणाऱ्या कपलला अटक

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरी पावणे दोन कोटींचा दरोडा टाकणाऱ्या कपलला अटक करण्यात आलीय, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. त्यांच्या घरातून २.४१ कोटींची चोरी झाली होती. याप्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली होती.

एका वेबसाईटने माहिती दिली होती की, हाय-प्रोफाईल चोरीमुळे, दिल्ली पोलिसांनी तपास पथके तयार केली होती. तपासाचा भाग म्हणून सोनम आणि आनंदच्या घरी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली गेली. या चौकशीमध्ये २५ कर्मचारी, तसेच ९ केअर टेकर, ड्रायव्हर, गार्डनर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सोनमचे हे सासर असल्याची माहिती समोर आली होती.

याबाबत अशी माहिती मिळाली होती की, सोनमचे सासरे हरीश आहुजा आणि सासू प्रिया आहुजा दिल्लीत आनंदची आजी सरला आहुजासोबत अमृता शेरगिल मार्गावर राहतात. ११ फेब्रुवारी रोजी सरला आहुजा (आजी) यांनी तिच्या तक्रारीनुसार दागिने आणि रोख रकमेसाठी कपाट तपासले, तेव्हा चोरी झाल्याचे समजले. २३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सोनम आणि आनंद यांच्या घरी चोरीचा तपास सुरू केला. गुन्ह्यात काही संशयित आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते मागील वर्षाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -