Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगबीअरच्या सेवनाने संभवतो मधूमेहाचा धोका

बीअरच्या सेवनाने संभवतो मधूमेहाचा धोका


अनेकजण बीअरमध्ये कमी अल्कोहोल असल्याने बीअरवर जास्त प्रेम करतात. पण बिअरमुळेही तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेकजण बिअरचे सेवन करतात. बीअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बीअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो. त्यामुळे बीअरने काहीच होत नाही, असे म्हणने चुकीचे ठरेल.

५ टक्क्याहूनही कमी म्हणजे १५० कॅलेरी अल्कोहोल बीअरमध्ये असते म्हणजे एका ३५० मिली बीअरच्या बाटलीमध्ये १३ ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे बीअरच्या अधिक प्रमाणात सेवनाने इंसुलिनचे शरिरातील प्रमाण वाढून सेंसिटिव्हीटी कमी होते. पण लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की, बीअरमध्ये अल्कोहोल कमी प्रमाणात असल्याने त्याचा काही तोट होत नाही. मात्र, असे नाही. बीअरचे अतिसेवन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

शरिरातील ग्लूकोजचे प्रमाणही अल्कोहोलमुळे कमी होते. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे बीअरचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधूमेहाचे विकार होण्याची शक्यता बळावते. अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे बीअरने शरिरातील साखरेचे प्रमाण लगेच वाढवत नसले, तरी त्याच्या दीर्घकाळ सेवनाने मधूमेहासारखे गंभीर आजार संभवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -