सीबीएससीकडून दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. cbse.gov.in. अधिक माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी असेल असे सांगण्यात आले आहे.
सीबीएसईकडून १० वी आणि १२ वीच्या सेमिस्टर २ च्या परिक्षेचे एडमिट कार्ड संकेतस्थळावर जारी केले आहेत. सीबीएसई बोर्डाकडून रेग्युलर आणि प्रायव्हेट दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांसाठी एडमिट कार्ड जारी केले आहेत.
(CBSE Exam)
दरम्यान रेग्युलर असणाऱ्या विद्यार्थांना हॉल तिकीट शाळेकडून देण्यात येणार आहे. याचबरोबर त्या हॉल तिकीटावर प्रिन्सीपल यांची सही, शाळेचा कोड, आयडी आणि पासवर्ड या सगळ्या गोष्टी नमूद असणार आहेत. तर प्रायव्हेट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वत: हून हॉल तिकीट डाऊनलोड करावे लागणार आहे. दरम्यान ही परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता दिल्याने सेमिस्टर १ ला १२ विद्यार्थांना वर्गात बसण्याची परवानगी होती ती आता १८ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, मास्क आणि टेम्परेचर तपासणी याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने तीन-टप्प्यात व्हेरीफिकेशन प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
इयत्ता १० वी आणि १२ वी सेमिस्टर २ ची परीक्षा दोन तासांची सकाळी १०:30 ते दुपारी १२:३० या वेळेत हाेईल.
विद्यार्थ्यांनी नियुक्त परीक्षा केंद्रांवर सकाळी ९:30 पर्यंत पोहोचायचे आहे. १० वाजता परीक्षा केंद्रात आपल्या जागेवर बसण्याची सूचना देण्यात आली आहे. यानंतर मुलांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंद केला जाईल आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.