ताजी बातमी ऑनलाइन टीम
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला. यंदा मान्सून सामान्य राहील. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २०२२ मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे.
१९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.