ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर (RR VS GT) 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो आहे. आज त्याने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करता आल्या.
गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि डेब्यू करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने (yash S Dayal) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा पाच सामन्यांपैकी चौथा विजय आहे. राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. राजस्थानने दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्यांना कायम राखता येत नाहीय.