Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्‍हापूर : व्यापारी पटेल खून प्रकरणी चौघांना सात दिवसांची कोठडी

कोल्‍हापूर : व्यापारी पटेल खून प्रकरणी चौघांना सात दिवसांची कोठडी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
टिंबर व्यापारी दीपक हिरालाल पटेल अपहरण व खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रवीण ऊर्फ बचू वालची पटेल (वय 52, रा मुदाळ तिट्टा, ता. भुदरगड), संदीप बाबूराव पाटील (36, जवाहरनगर इचलकरंजी), विठ्ठल ज्ञानदेव सुतार (50, रा. हत्तीमहाल रोड, राधानगरी) व रंगराव बळवंत पाटील (40, रा. भोसलेवाडी पाटपन्हाळा, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.



दरम्यान, पटेल यांच्यावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात हातकणंगले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रामेश्‍वर वैंजणे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे अधिकारी तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. मात्र हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील उपस्थित नव्हते. यामुळे पटेल कुटुंबीय व नातेवाईक यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.
दीपक पटेल यांचा मृतदेह तब्बल 18 दिवसांनी राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे खून करून पुरून ठेवल्याचे बुधवारी उघडकीस आले.

उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीय, नातेवाईकांनी मृतदेहाचा ताबा घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेहाचा ताबा घेणार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्याने सीपीआर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह अधिकारी, पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.

तानाजी सावंत, संजय गोर्ले यांनी मृत दीपक पटेल यांचे कुटुंबीय, कोल्हापूर जिल्हा पटेल समाजाचे अध्यक्ष गोपाल पटेल, चंदूलाल पटेल, राजू पटेल, राजू गोरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. याप्रकरणी योग्य चौकशी करून दोषींवर कठोर करण्यात येईल. अशीही पोलिस अधिकार्‍यांनी ग्वाही दिली.

कुटुंबीय, पटेल समाज आणि ग्रामस्थांमार्फत व्यक्‍त झालेल्या भावना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. तरुणाचा खून होऊन बराच कालावधी झाल्याने मृतदेहाची विटंबना होऊ देऊ नका. अंत्यसंस्कारानंतर आपणा सर्वांची पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्यांशी भेट घडवून दिली जाईल, असेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गुरुवारी सकाळी 11.30 वाजता कुटुंबीयांनी मृतदेहाचा ताबा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -