Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीगुजरात निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु; दर महिन्याला पंतप्रधान करणार दौरा

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु; दर महिन्याला पंतप्रधान करणार दौरा

गुजरात विधानसभेसाठी चालू वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार असली तरी आतापासूनच भाजपने या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला गुजरातचा दौरा करणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी शुक्रवारी दिली. येत्या 18 तारखेपासून पंतप्रधान तीन दिवस गुजरात दौर्यालवर जात आहेत. हा त्यांच्या निवडणूक प्रचार तयारीचा भाग मानला जात आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या कितीतरी आधी मोदी यांनी या राज्याचे झंझावाती दौरे केले होते. पूर्वांचल एक्सप्रेसवे उद्घाटन असो वा अलिगड विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन असे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते. त्याच धर्तीवर आता मोदी यांनी गुजरातसाठी योजना आखल्याचे मानले जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचा निकाल आल्याच्या दुसर्या च दिवशी मोदी यांनी 11 मार्चला गुजरातला भेट देऊन अहमदाबादमध्ये विजयी रॅली काढली होती. पंतप्रधानांच्या वारंवारच्या दौर्यांलमुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे. 18 तारखेपासून सुरु होणार्याय दौर्या दरम्यान मोदी आदिवासी बहुल दाहोदचा दौरा करणार आहेत. याशिवाय शेती आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या बनासकांठालाही ते भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक डेअरी प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महिला दूध उत्पादक तसेच शेतकर्यांतशीही ते संवाद साधणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -