Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसासरच्या त्रासाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. याप्रकरणी बुधवारी (दि. 13) पिंपरी आणि चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत विवाहितेचा भाऊ नंदकुमार गंगाधर बोरूळकर (30, रा. लातूर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बालाजी माधव नाईकवाडे, माधव नाईकवाडे (दोघे रा. उमरगा, ता. कंधार, जि. नांदेड), बाळू डांगे (रा. लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 फेब्रुवारी 2022 रोजी मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

आरोपींनी पुण्यात घर घेण्यासाठी विवाहितेकडे माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच, तिला शिवीगाळ करीत धमकी देत क्रूरपणे वागवले.
विवाहितेच्या वडिलांवर देखील पैसे देण्यासाठी दबाव टाकला. शेवटी वारंवार होणार्याा त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मयत विवाहितेच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासू कमल विलास करपे, सासरा विलास करपे (दोघे रा.अ गणेशनगर, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 12 एप्रिल रोजी गणेशनगर, चिखली येथे घडली. विवाहिता लवकर उठून मुलाला शाळेत सोडायला गेली नाही. तसेच, कार घेण्यासाठी तिने माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -