मिरज / प्रतिनिधी
ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहून सर्व नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार दिले.त्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतात नाही तर १५२ देशात साजरी केली जाते.तसेच सालाबादप्रमाणे मिरजेत सकाळी बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते.
आणि ४ वाजण्याच्या सुमारास मिरजेतून बौध्द वसाहत येथून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भव्यदिव्य अशी मिरवणूक काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते.तसेच विविध मंडळ भव्य असे देखावे साजरे करत असतात.या २०२२ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये महात्मा फुले चौक मित्र मंडळाची भव्यदिव्य अशी मिरवणूक सर्वांना आकर्षित ठरली.यामध्ये डाॅल्बी,लाईट यांनी सजावट करुन महात्मा फुले चौक मित्र मंडळाने सलग ६ वर्षे झाली.आपले मिरजेत नाव गाजवले आहे,आणि यावर्षीही २०२२ मध्ये मिरजेत रेकॉर्ड बनवले आहे.