ताजी बातमी ऑनलाईन टीम
एक लाख रुपयांचे इनाम : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून वचनपूर्ती
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी बँक, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील देवठाणे (ता. पन्हाळा) येथील पैलवान पृथ्वीराज पाटील याने सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कस्ती परिषदेच्या ६४ व्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब मिळवल्याबद्दल त्याची शुक्रवारी सायंकाळी सांगरूळ फाटा ते कारखाना साईट अशी वाद्यांच्या गजरात हत्तीसोबत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्याला तसेच त्याला कुंभी सहकार समूहाच्या वतीने १ लाख रुपयांचे इनाम देण्यात आले.
कुंभी कासारी परिसरातील मल्लाने महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब मिळविल्यास त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा कुंभी कासारी कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके कारखान्याच्या प्रत्येक वर्षी मानधनधारक कुस्ती स्पर्धेत करीत होते. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील पैलवान पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब मिळवल्याने माजी आमदार नरके यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याच्या केलेल्या घोषणेची वच केली आहे.
कुडीत्रे (ता करवीर) कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी बँक, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात पृथ्वीराज व कुस्ती संकुलातील सुवर्ण व कास्यपदक विजेत्या सहा पैलवानांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये विजय पाटील (६१ किलो), सुशांत तांबोळकर (९२ किलो),सुवर्णपदक, अतुल चेचर (५७ किलो), स्वप्नील पाटील (७४ किलो), भगतसिंग खोत, प्रवीण पाटील (७९ किलो) यांचा समावेश
आहे.
छत्रपती शाहूराजांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला. स्व. डी. सी. नरके आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी कुंभी कासारी मानधन धारक कुस्ती स्पर्धा सुरू केली. त्यामुळे या भागात क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली. भागातील अनेक पैलवानांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. पृथ्वीराजच्या विजयाने कुंभी कासारीच्या क्रीडा लौकिकात भर पडली असून या चौथ्या महाराष्ट्र केसरीमुळे कारखाना परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कारखाना कार्यक्षेत्र ही मल्लांची खाण आहे, अनेक मल . राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
यावर्षी सातारा येथे पार पडलेल्या ६४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद स्पर्धेत कारखाना कुस्ती संकुलातील ६ मल्लानी पदके प्राप्त केले आहेत. पृथ्वीराज २०१८-१९ चा खुल्या गटातील मानधनधारक मल्ल आहे. या सर्व विजयी मल्लांचा शुक्रवारी शेतकरी सांस्कृतिक भवन येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील कुस्तीप्रेमी, सर्व महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी, सेना केसरी, इतर खेळाडू, सभासद बिगर सभासद,कर्मचारी तोडणी- वाहतूकदार, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी व्हाईस चेअरमन निवास वातकर, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, व संचालक मंडळ उपस्थित होते.