Tuesday, December 24, 2024
Homeक्रीडादीपक चहर आयपीएलमधून बाहेर

दीपक चहर आयपीएलमधून बाहेर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई ; सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघातील अष्टपैलू दीपक चहर याला पाठदुखीमुळे अनफिट ठरविण्यात आले असून तो आता आयपीएलमधील उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल.



गेल्या फेबुवारीमध्ये भारतामध्ये झालेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळताना दीपक चहरला स्नायुदुखापत झाली होती. त्याचप्रमाणे । कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज रसिख सलाम यालाही पाठदुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. कोलकाता संघाने रसिख सलामच्या जागी हर्षित राणाला संधी दिली आहे.


दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. सध्या तरी या संघाच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. भारतामध्ये कोरोनाची लागण होत असलेले रुग्ण आढळत असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या मे महिन्यात भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने आयपीएल स्पर्धा अर्धवट स्थितीत रद्द करण्यात आली होती. आणि त्यानंतर या स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविला गेला होता. बीसीसीआयने यावेळी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार स्टेडियमची निवड केली. कारण या परिसरामध्ये कोरोनाची चिंता विशेष करण्याची गरज नसल्याने या स्टेडियममध्ये आतापर्यंतचे सामने खेळविले जात आहेत. मुंबई, पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी सामने खेळविले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -