कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहिर होणार आहेत. या जागेवर काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. तर करुणा शर्मा यांनीही या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी उडी घेतली. त्यांनी शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण आत्तापर्यंत झालेल्या 11 फेऱ्यांमध्ये करुणा शर्मा यांना अवघे 61 मते मिळाली आहेत.
दरम्यान, कॉंग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यातच या निवडणुकीमध्ये खरी चुरस आहे. जयश्री जाधव 61 हजार 9 मतांनी आघाडीवर आहेत, तर सत्यजित कदम 48 हजार 2 मतांनी पिछाडीवर आहेत.