Friday, July 25, 2025
Homeकोल्हापूरचंद्रकांत पाटलांच्या होम ग्राऊंडवरच भाजप हद्दपार; तुल्यबळ लढतीत बंटी पाटलांची पुन्हा सरशी...

चंद्रकांत पाटलांच्या होम ग्राऊंडवरच भाजप हद्दपार; तुल्यबळ लढतीत बंटी पाटलांची पुन्हा सरशी !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ठाकरे सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जयश्री जाधव यांनी दमदार विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा १८ हजार ९०० मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली.



आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेवर पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत लढत जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यामध्ये फक्त उमेदवार म्हणूनच होती. खरी लढत ही जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्येच होती. प्रचारात उमेदवार बाजूला आणि आरोप प्रत्यारोपांची फैरी या दोन पाटलांमध्येच झडल्या. मतदारांची ईडीची चौकशी भीती घालण्यापर्यंत प्रचाराने पातळी गाठली.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यापासून राज्य पातळीवरील तगड्या नेत्यांना प्रचारात उतरवले होते. महाविकास आघाडीकडूनही अनेक मंत्र्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हक्काची मतदारसंघ काँग्रेसला देऊन शिवसैनिकांना सुद्धा शब्द पाळण्यास सांगितले होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही त्यांनी ऑनलाईन सभा घेत भाजपवर प्रहार केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -