ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा (Riteish-Genelia) हे बी-टाऊनचे पॉवर कपल आहेत. या स्टार कपलचे इतके आलिशान घर आहे की, जेनेलिया आणि रितेशने अनेकदा फोटोशूटसाठी आपलं घर निवडलंय. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कपलमध्ये फिल्मी लव्हस्टोरी पाहायला मिळते. ज्यामध्ये स्टार कपल अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची प्रेमळ पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Riteish-Genelia) यांचे नाव प्रथम येते. दोघेही त्यांच्या गोंडस केमिस्ट्रीमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. म्हणूनच या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांनाही खूप आनंद होतो.

रितेश देशमुखने त्याच्या मुख्य गेटपासून सुरू होणाऱ्या घराला व्हाईट टच दिला आहे. त्याच्या घराचा मुख्य दरवाजा पेस्टल पांढऱ्या रंगाचा असून, त्यावर कोरीव काम करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन मोठे खांबही आहेत, जे घराच्या प्रवेशाला रॉयल लुक देतात आणि हा रॉयल लुक पूर्ण करण्यासाठी या मुख्य प्रवेशद्वारावर राखाडी रंगाचे संगमरवरी बसवण्यात आले आहेत. घराचा प्रवेश अतिशय सुंदर दिसतो.

रितेश आणि जेनेलियाच्या घरातील सर्वात खास जागा म्हणजे त्यांच्या घराच्या मधोमध असलेल्या पायऱ्या, जिथे हे जोडपे अनेकदा त्यांच्या फॅमिली फोटो काढताना दिसतात. जोडप्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक शाही जिना आहे, जो दोन्ही बाजूंनी उघडा आहे. या पायऱ्यांवर पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे संगमरवर घातले आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर दिसतो. या पायऱ्यांमधील भिंतीवर रितेश देशमुख यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मोठा फोटो आहे.
