ताजी बातमी ऑनलाईन टीम
आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग, मी लढलो तर काय होईल? मी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्यांनी आम्हला मतदान करत आमच्यावर विश्वास दाखवला. तसेच कोल्हापुरातून पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला त्यांचेही मी अभिनंदन करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधरं राहिलंय असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय.
तसेच तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी ही निवडणूक झाली. तसेच तीन पक्ष एकत्रित लढूनही त्यांच्या तोंडाला फेस आल्याचे पाटील म्हणाले. तसेच माध्यमांनी पाटील यांना हारलो तर हिमालयात जाईन यावर विचारलं असता त्यांनी निवडणूक लढलो आणि त्यामध्ये पराभव झाला तर हिमालयात जाईन असं म्हटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘हिमालयात जाईन’ या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय, मी निवडणीक लढलो आणि हारलो तर हिमालयात जाईल, असं म्हटलं होतं, त्यामुळे मी निवडणूक लढलेलो नसल्याने हिमालयात जाण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी नमूद केलं.