Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगजोतिबाची सासनकाठी नाचवताना थकल्याने तरुणाचा मृत्यू

जोतिबाची सासनकाठी नाचवताना थकल्याने तरुणाचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाइन टीम

वाडी रत्नागिरी जोतिबा येथे चैत्र यात्रेनिमित्ताने सासनकाठी नाचवून थकून चक्कर येऊन पडल्याल्या एक तरुणाचा मृत्यू. अतुल संभाजी कदम (वय २६ रा.टेंबू ता. कराड जि. सातारा) असे त्याचे नाव असून या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून – बाबतची वर्दी हणमंत कदम यांनी पोलिसात दिली.



या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टेबू येथील कदम कुटुंबियांचे कुलदैवत जोतिबा असून अतुल यांच्या घरी मनाची सासनकाठी आहे या सासनकाठीचा मान अतुल यांच्या वडिलांना आहे. आज जोतिबा देवाची चैत्रयात्रा असल्याने ते आपल्या आई वडिलांच्या व गावच्या लोकांसोबत जोतिबा डोंगरावर आले होते.



आज ता.१६ रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास सेंट्रल प्लाझाजवळ पायरी मार्गावर अतुल हा सासनकाठी नाचवून थकलेने त्यास चक्कर आली व तो खाली पडलेने त्याला तेथील लोकांनी तातडीने उपचाराकरीता सेंट्रल प्लाझा जोतिबा येथील व्हाईट आर्मीचे डॉक्टरांचेकडे नेले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. कोडोली येथील येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चिले करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -