Friday, August 1, 2025
Homeसांगलीसांगलीत वादळी पावसाचे थैमान

सांगलीत वादळी पावसाचे थैमान

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सांगलीत शनिवारी दुपारी मेघगर्जना आणि जोरदार वार्‍यासह वादळी पाऊस कोसळला. यामुळे भाजी, फळे विक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात तुंबलेल्या ड्रेनेजने चौकांना तळ्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी झाडे पडली होती. या पावसाने शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते.



सांगलीत सकाळपासून उष्णतेचा पारा वाढला होता. दिवसभर उकाडा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने वाहनधारक, भाजी विक्रेत्यांसह रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता की, अनेकांना माल सुरक्षित ठिकाणी नेण्यासही वेळ मिळाला नाही. त्यामुळे या पावसात वस्तू भिजल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शहरात रस्त्यावर, मैदानात तसेच स्टेशन चौक, झुलेलाल चौक, मारूती रस्ता, छत्रपती शिवाजी मंडई, राममंदिर चौक, बसस्थानक परिसर, राजवाडा चौक, मार्केट यार्डासमोरील रस्ता, गारपीर चौक, 100 फुटी रोड, गणेश मार्केट, हायस्कूल रोड, छत्रपती शिवाजी क्रीडांगण यासह सखल भागात पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. जोरदार वार्‍याने झाडे उन्मळून पडली होती. झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. शहरात पावसाने दलदल निर्माण झाली होती.
शहरात अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित

सांगलीत दुपारी झालेल्या पावसावेळी वार्‍याचा वेग जोरात होता. यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारावर पडल्याने तारा तुटल्या होत्या. यातुळे शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -