Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगखिचडीमध्ये मीठ जास्त टाकले, संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या!

खिचडीमध्ये मीठ जास्त टाकले, संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नाश्त्यामध्ये मीठ जास्त पडल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातल्या भाईंदर (Bhayandar) टाऊनशिपमध्ये ही घटना घडली आहे. शुल्क कारणांमुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder Case) केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील फाटक रोड परिसरात ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या निलेश घाग (46 वर्षे) या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी निलेशची पत्नी निर्मला (40 वर्षे) हिने नाश्त्यासाठी खिचडी तयार केली होती. या खिचडीमध्ये मीठ जास्त पडले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या निलेश आणि निर्मला यांचे भांडण झाले. या भांडणामध्ये निलेशने पत्नीची कपड्याने गळा आवळून हत्या केली.



या घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी निर्मलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर भाईंदर येथील नवघर पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात भादंवि कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर चौकशी करुन पोलिसांनी आरोपी निलेश घागला अटक केली. अगदी शुल्लक कारणामुळे घडलेल्या या घटनेमुळे भाईंदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -