ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यावर पावसाचे (Rainfall) सावट आहे. कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात 18 एप्रिल म्हणजेच उद्यापासून पावसाचा इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागामध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने (weather department) दिला आहे. पण विदर्भात (Vidharbh) उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी लागणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे पोहोचल्याने उकाडा आणखी वाढला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराज्याने पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या शेतीची आणि पिकांची काळजी घ्यावी. वेळीच त्यांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात उन्हाचे चटके कायम आहेत. सध्या विदर्भातील पारा 44 अंशापार झाला आहे. त्यामुळे आणखी उष्णता वाढण्याची शक्यता आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिकांचे खूप हाल होत आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात उन्हाच्या झळ्या वाढल्या आहेत. त्याचसोबत उकाडा वाढल्यामुळे अंगातून घामाच्या धारा सुरु आहेत. उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक थंड ठिकाणी बसण्याचा आणि शीतपेयाचा पर्याय निवडत आहेत. तसंच, उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्यामुळे विदर्भातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.