ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे : मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. इथे एक मुस्लीम पत्रकार आहेत. ते स्वत: बाळा नांदगावकरांना भेटले आणि आपल्या लहान मुलाला अजानचा (Azan) त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा त्रास मुस्लिमांनाही होत आहे. आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल.
दोन घोषणा –
महाराष्ट्र दिनी संभाजीनगरात एक मेला जाहीर सभा घेणार आहे पाच जूनला सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार