ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा कंटेंट क्रिएटर असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवीन भन्नाट फीचर युजर्सच्या भेटीला YouTube Shorts आणणार आहे. रिमिक्स व्हिडीओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना हे फिचर खूपच उपयोगाचे ठरणार आहे. हे फिचर अगदी टीक-टॉकप्रमाणे असून यात काही नियम लागू केले आहेत, जे निर्मात्यांना YouTube प्लॅटफॉर्मवरून अब्जावधी व्हिडीओंच्या क्लिपचा वापर करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
रीमिक्स टूल या नवीन फिचरचा आणखी विस्तार करत निर्मात्यांना त्यांच्या स्वतःच्या YouTube शॉर्ट पोस्टमध्ये इतर व्हिडीओंमधील ऑडिओचा नमुना वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे. आपल्या ऑडिओ लायब्ररीतील संगीतामध्ये मिक्स करण्यासाठी किंवा संपूर्ण YouTube व्हिडींओंमधून मूळ ऑडिओ वापरण्यासाठी आमचे शॉर्ट्स क्रिएशन टूल वापरून तुमचे स्वतःचे छोटे व्हिडीओ तयार करा, अशी माहिती कंपनीने एका अपडेटमध्ये दिली आहे.
लोकप्रिय TikTok टूल ‘स्टिच’ सारखे YouTube शॉर्ट्सचे नवे फिचर आहे. कंपनीने म्हटले आहे की, सॅम्पल ऑडिओसह तुम्ही तयार केलेल्या शॉर्ट्सचे श्रेय स्त्रोत निर्मात्याच्या मूळ व्हिडीओला दिले जाणार आहे. YouTube च्या संगीत भागीदारांकडून कॉपीराइट सामग्री असलेले संगीत व्हिडीओ रीमिक्सिंगसाठी वापरता येत नाहीत.
कंपनीने यापुढे आणखी माहिती देताना पुढे स्पष्ट केले की, इतरत्र बनवलेला छोटा व्हिडीओ तुम्ही अपलोड केल्यास, तुम्ही वापरत असलेली कॉपीराइट-संरक्षित सामग्री YouTube वर तुमच्या वापरासाठी मंजूर असल्याची खात्री करा. कंपनीने असे देखील सुचवले आहे की कॉपीराइट असलेले म्यूझिक वापरल्यामुळे तुमच्यावर Content ID दावा होऊ शकतो.
लाँग-फॉर्म व्हिडीओंमधून १ ते ५ सेकंदाचे सेक्शनमध्ये क्लिप करण्याची परवानगी नवीन अपडेट निर्मात्यांना देईल. शॉर्ट्स YouTube वर सॅम्पलिंगसाठी आपोआप निवडले जातात आणि तुम्ही त्यांची निवड रद्द करू शकत नाही. तुमच्या चॅनेलवरील लॉंग फॉरमॅट व्हिडीओंसाठी, तुम्ही YouTube स्टुडिओमध्ये ऑडिओ सॅम्पलिंग मर्यादित करू शकता, असे देखील कंपनीने म्हटले आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने असेही म्हटले आहे की, YouTube शॉर्ट्स आता वेब आणि टॅबलेटद्वारे उपलब्ध आहे.