Tuesday, November 25, 2025
HomeसांगलीSangli Sabha: सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Sangli Sabha: सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

ताजी बातमी ऑनलाईन टीम


सांगली : दफनभूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरच्या मुद्यावरुन महापालिकेच्या महासभेत चांगलाच गदारोळ झाला. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP)च्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. यावेळी भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौरांसमेरील राजदंड पळवत स्वतःच्या ताब्यात घेतला.



यानंतर महापौर सभागृहातून निघून गेले. फेब्रुवारीमध्ये कोरम नसतानाही महापौर यांनी कामकाज पूर्ण केले. या विरोधात काँग्रेस-भाजपने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण, ही याचिका फेटाळल्यामुळे आज भाजप-काँग्रेसच्या नगरसेवकांना सभा चालू द्यायची नव्हती म्हणून गोंधळ घातला, असा आरोप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गदारोळ घालणाऱ्या नगरसेवकांवर केला आहे.

सभा नियमाप्रमाणे पार पडल्याचा महापौरांचा दावा
दरम्यान सभा नियमाप्रमाणे पार पडली, असा दावा महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केला. तर ही सभाच बेकायदेशीर होती. महापौर अल्प मतांमध्ये आले आहेत. याची जाणीव झाल्यानेच त्यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभागृहातून पळ काढला. यापुढे अशा कारभाराला संघटीतपणे विरोध करू, असा इशारा भाजप गटनेने विनायक सिहसने, जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिला. तर असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा उपमहापौर उमेश पाटील, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांनी दिला. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागील सभेचे (18 फेब्रुवारी) इतिवृत्त कायम करण्याचा विषय अजेंड्यावर होता.

मागील महासभेबाबत 20 एप्रिलला सुनावणी
मागील महासभा कोरमच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरली होती. या विरोधात भाजप व काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बुधवार 20 एप्रिल रोजी सुनावणी आहे. तत्पूर्वी इतिवृत्त कायम करण्याचा विषय रद्द करावा अशी मागणी काँग्रेस व भाजपच्या 53 सदस्यांनी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. याशिवाय भाजपच्या सविता मदने यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला होता. यावर चर्चा व्हावी अशी मागणी भाजप व काँग्रेस सदस्यांनी केली. मात्र महापौरांनी याकडे दुर्लक्ष केले. भाजप सदस्यांनी आक्रमक होत महापौरांसमोर धाव घेतली. काँग्रेसचेही अनेक सदस्य यामध्ये सहभागी झाले. त्यांनी संयुक्तरित्या महापौरांना घेराव घातला. चर्चेची मागणी केली. मात्र महापौरांनी त्यांना जुमानले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -