Sunday, September 8, 2024
Homenewsभोंग्याचा निर्णय होणार? आज बैठक

भोंग्याचा निर्णय होणार? आज बैठक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने याचा धसका घेतला आहे. आज या भोंग्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्यानुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले असून विविध मुद्द्यावर चर्चा करणार आहे. राज्यत कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या बैठकीनंतर भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेतल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार, मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास नाशिक पोलिसआयुक्तांचे मनाईचे आदेश आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -