Sunday, July 6, 2025
Homeसांगलीविवाहितेचा छळ : घर बांधकामासाठी माहेरहून पाच लाखाची मागणी

विवाहितेचा छळ : घर बांधकामासाठी माहेरहून पाच लाखाची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवरा व सासूविरोधात गुन्हा

कुपवाडमध्ये विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घर बांधकामासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेला सतत ममारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी नवरा व सासू विरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.



याप्रकरणी विवाहिता आकांक्षा प्रवीण यादव ( सध्या रा. दक्षिण शिवाजीनगर, सांगली मूळ गाव कुपवाड ) हिने कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित नवरा प्रवीण दिपक यादव,सासू सुनिता दिपक यादव (दोघेही रा. राजारामबापू हौसिंग सोसायटी, कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
फिर्यादी आकांक्षाचे प्रवीणसोबत लग्न झाल्यावर जुलै २०२१ नंतर नवरा व सासू सुनिता या दोघांनी ‘माहेरहून घरबांधणीसाठी पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून या दोघांनी तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार विवाहितेने दाखल केली आहे. त्यानुसा रपोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -